Select Page

कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार २०२२
नंदिनी जाधव, पुणे
पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे

नंदिनी जाधव यांची मुख्य ओळख म्हणजे महिलांच्या केसातील वाढवलेली जट काढणे. अनिष्ट रुढी-परंपरांच्या सामाजिक व मानसिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं काम अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून नंदिनी जाधव गेली ६ वर्षांहून अधिक काळ करतायत. जादूटोणा कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नंदिनीताईंनी २७ जिल्ह्यांचा दौरा केलेला आहे. नंदिनीताई सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष आहेत ‘पाणी फाउंडेशन’च्या ‘वॉटरकप’ स्पर्धेसाठी सासवड तालुक्यातील उदाची वाडी या गावातल्या गावकर्यांचं संघटन करून नंदिनीताईंनी स्वत: तिथे ४० दिवस श्रमदान केलेलं आहे.