निब्बाण
महाराष्ट्र फाउंडेशन रा. शं. दातार नाट्य पुरस्कार – २००७
तसं पाहिलं तर सूर्योदय आणि सूर्यास्त ह्या क्रमिक घटना आहेत. आणि त्या घटना ढोबळ आहेत. ह्या दोन ढोबळ घटनांच्या दरम्यान माणूस जगण्याची गुंतागुंत निर्माण करतो. त्याच . घटनांच्या बाबतीत दुसरी नोंद अशी की अखिल मानवजातीच्या किंवा ह्या जगाच्या आयुष्यात Non-corrupt क्षण हे असे दोनच. माणसाचा जन्म आणि मृत्यूसुद्धा भ्रष्ट ठरू शकतो. पण सूर्य उगवणे आणि मावळणे ह्यात भेसळ होऊ शकत नाही. तसाच स्वच्छ ढोबळपणा अरुण मिरजकरांच्या लेखनात आहे
