Select Page

निखिल वागळे

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार 2015

पत्रकार, लेखक
पत्ता –
संपर्क – मो. ९८३३१३०७२०

निखिल वागळे या व्यक्तिमत्त्वात बंडखोरीचे बीज रोवले गेले ते लहानपणापासून केलेल्या वाचनातून. तरुण वयात ‘ युवक क्रांती दला’ची छाप महाराष्ट्रातल्या तरुण पिढीवर मोठया प्रमाणात होती. पुढे जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीकडे तरुणवर्ग आकर्षित झाला. वागळे त्यांत आघाडीवर होते. बिहारमधील वास्तव्यात अनेक अनुभव नव्यानीच घेत असताना त्यांच्यातील निडर कार्यकर्ता तयार होत गेला. छात्र युवा संघर्ष, राष्ट्र सेवादल, सर्वोदयी अशा संस्थांबरोबर त्यांनी काम केले. पण ‘ विशिष्ट संघटनेत बांधून घेण्यासारखी आपली प्रवृत्ती नाही’ हे लक्षात आल्यावर ते पत्रकारितेतच पूर्णवेळ कार्यरत राहिले. ‘दिनांक’ साप्ताहिकाचे ते संपादक-संस्थापक होते. या साप्ताहिकात बेधडक शैलीत त्यांनी निर्भयपणे लिहायला सुरुवात केली. त्यातून त्यांची अशी खास आक्रमक अशी शैली तयार होत गेली. या वृत्तीतूनच पुढे त्यांच्या ‘महानगर’ या दुपारी प्रकाशित होणा-या दैनिकाचा जन्म झाला. अल्पावधीतच महानगर हे चळवळींचे मुखपत्र बनले. तळागाळातल्या पीडितांचे विषय ते ऐरणीवर घेऊ लागले. ‘आयबीएन लोकमत’ या वृत्तवाहिनीवर त्यांचा ‘आजचा सवाल’ हा चर्चात्मक कार्यक्रम विलक्षण लोकप्रिय होता. गडकरी त्या चर्चांमध्येही वागळे आपली रोखठोक मते ठामपणे मांडत. ‘ग्रेट भेट’ हाही त्यांचा कार्यक्रम आवर्जून पाहिला जायचा.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2015- निखिल वागळे