
नीलेश निमकर
युवा कार्यकर्ता पुरस्कार 2011
सामाजिक कार्यकर्ते
पत्ता – २३३, वडवली रोड, मु. पो. लोणारे, ता. वाडा. जिल्हा ठाणे ४३१३०३
‘स्वातंत्र्य आणि विवेक या मूल्यांप्रत जाण्यासाठी प्रत्येकाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालेच पाहिेजे’ असे नीलेश निमकर यांचे ठाम मत आहे. अतुल कुलकर्णी यांच्यासोबत त्यांनी ‘क्वालिटी एज्यूकेशन सपोर्ट ट्रस्ट’ ही संस्था स्थापन केली. समाजातील अनेक प्रश्नांचे मूळ व्यक्तिगत पातळीवरील विवेकाच्या अभावातच आहे, शिक्षणाने विवेक रुजतो यावर विश्वास असलेली नीलेश निमकर यांची कार्यप्रणाली आहे. प्राथमिक शिक्षणाच्या अनुषंगाने विविध विषयांसाठी शैक्षणिक सामग्री तयार करणे, पूरक साहित्य तयार करणे, व्हिडिओ फिल्मस बनविणे असे प्रकल्प निमकर राबवितात.