Select Page

नीलिमा मिश्रा

विशेष कार्य पुरस्कार :2012

सामाजिक कार्यकर्त्या
पत्ता – मु. पो. बहादरपूर, ता. पाटोळा, जिल्हा जळगाव
संपर्क – मो. ८००७९१०३३२

नीलिमा मिश्रा यांनी जळगाव जिल्हयातील बहादरपूर या गावात महिलांच्या हस्तकला गुणांना वाव देण्यासाठी सुरु केलेले कार्य आता जागतिक स्तरावर पोहचलेले आहे. त्यामुळे तेथील महिलांमध्ये एक आगळा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल जागतिक दर्जाचा ‘रॅमन मॅगसेस पुरस्कार’ नीलिमा मिश्रा यांना देण्यात आलेला आहे.. ग्रामीण महिलांच्या झुंजार वृत्तीचा, उपजत शहाणपणाचा, जिद्दीचा आणि संघटित कष्टांचा सुयोग्य विनियोग केला तर महिला काहीही साध्य करु शकतात हा विश्वास नीलिमा मिश्रा यांच्याकडे होता. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या आपल्या बहादरपूर या गावात परतल्या. त्यांच्या महिला प्रचंड तणावात आहेत, पती व्यसनी आहे, हाती काम नाही ही तिथल्या महिलांची स्थिती लक्षात आली आणि त्यांनी महिलांना संघटित करायला सुरुवात केली. त्यांचा बचत गट निर्माण करून त्यांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखविला. शेवया , कुरडया, पापड यासारख्या खाद्यपदार्थांची निर्मिती करत असतानाच महिलांना व्यवस्थापनाचे धडेही नालिमा मिश्रा यांच्याकडून मिळू लागले. कालांतराने महिलांनी गोधड्या बनविण्यास सुरुवात केली. प्रचंड जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर महिलांच्या या गोधड्या दहा वर्षात विदेशात जाऊन पोहोचल्या. बहादरपूरसारख्या इतर गावांमध्येही त्यांनी महिलांचे सक्षमीकरण केले. महिलांना स्वबळावर उभे करुन उद्यमशील बनविण्यात नीलिमा मिश्रा यांचा मोठा वाटा आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2012- नीलिमा मिश्रा