
नीरजा
साहित्य : ललित ग्रंथ पुरस्कार 2013
कवयित्री, कथाकार
पत्ता – ए १४, सी. जी. दर्शन, अवधूत नगरजवळ, शिवाजी मार्ग, दहिसर पूर्व , मुंबई ४०००६८
संपर्क – मो. ९९६९८१०८९६
‘ मराठी काव्य प्रवाहातील स्वत:ची विशिष्ट अशी नाममुद्रा उमटवलेल्या संवेदनशील कवयित्री आणि लेखिका’ अशी नीरजा यांची ओळख साहित्यजगतातआणि वाचकांत आहे. ‘निरर्थकाचे पक्षी’ या काव्यसंग्रहात नीरजा यांनी स्त्रिच्या स्व-भानाचा, विश्वभानाचा प्रवास ऐतिहासिक कालपटलावर चित्रित केलेला आहे. स्त्रिच्या वाटयाला आलेले दु्यमत्त्वही यात अधोरेखित केलेले आहे. शोषित व भरडली जाणारी, तरीही व्यवस्थेला जाब विचारुन समर्थपणे पुढे जाणारी स्त्री या काव्यसंग्रहातून प्रत्ययकारी रुपाने साकार झाली आहे.
नीरजा यांचे ‘निरन्वय’, ‘वेणा’, ‘स्त्री-गणेशा’, ‘निरर्थकाचे पक्षी’ असे कवितासंग्रह तर ‘जे दर्पणी बिंबले’, ‘ओल हरवलेली माती’, ‘पावसात सूर्य शोधणारी माणसं’ हे कथा संग्रह तर ‘बदलत्या चौकटी’, ‘चिंतनशलाका’ हे स्तंभलेखन संग्रह प्रसिध्द आहेत.
अंकातील मुलाखत वाचा…
पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ
महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2013- नीरजा