Select Page

कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार २०२३
निसार अली सफदर अली सय्यद आणि वैशाली निसार अली सय्यद (महाडिक) (मुंबई)

(पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप आहे.)

मुंबईच्या गोरेगाव पूर्वमधील आर्थिक परिस्थिति बेताची असल्याने टिफीनचा व्यवसाय करणारी वैशाली महाडीक आणि पोलिस खात्यात असलेल्या वडिलांच्या आजारपणामुले शिक्षण सोडावे लागलेले निसार अली सय्यद यांचे धर्म भिन्न असले तरीही सामाजिक कामातून भेट होऊन 2003 मध्ये ते विशेष विवाह कायद्यानुसार विवाहबद्ध झाले. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून कार्यरत असणारे निसार आणि वैशाली यांनी सफल विकास वेल्फेअर सोसायटी या संस्थेची स्थापना केली आहे. डॉ. दाभोळकर यांच्या हत्येनंतर रस्त्यावर विवेक जागर परिषद आयोजित केली होती. हे दांपत्य ऐन कोरोंनाच्या काळात लोकांना आधार देण्यासाठी बाहेर पडले. या काळात त्यांनी 800 लोकांना जेवणाचे पाकीट वाटप, औषध फवारणी, रेशन वाटप, मास्क वाटप, तसेच जनजागृतीचे काम केले. केवळ 4 महिन्यात दोन वेळा रक्तदान शिबीर घेऊन 104 बाटल्या रक्त संकलन केले. वैशाली यांना मधुमेह आणि रक्तदाब याचा त्रास असूनही त्यांनी ‘लोक शास्त्र सावित्री’ या नाटकाचे प्रयोग सादर केलेएकल महिलांसाठी हळदी-कुंकू असे कार्यक्रम न राबवता त्यांच्यासोबत मालाड मालवणीमध्ये व्हलेंटाईन डे साजरा करतात. . सध्या निसार हे मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत आहेत.