Select Page

न्यायरत्न विनोद

महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २००१  

भारतात स्वातंत्र्योत्तर काळात अशा अनेक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होत्या की ज्यांनी लोकसेवा, लोकजागृती, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याद्वारे समाजसेवा केली. कसलीही वाच्यता न करता समाजसेवेसाठी देह झिजविला. प्रसिद्धीपराङ्मुख राहून त्यांनी स्वीकृत कार्य केलेले असल्याने त्यांच्या या समाजसेवेवर त्या काळात प्रकाश पडला नाही. किंवा त्यांनी तो पडणार नाही याची खबरदारी घेतली. तो सारा काळ गुप्तपणे कार्य करण्याचाच होता. लोकजागृतीचे, समाजउत्थापनाचे कार्य करीत आहे याची इंग्रज सरकारला तपशीलवार माहिती कळणे धोक्याचे होते.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९९ -पु.ल. देशपांडे