Select Page

पुष्पा भावे

समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार 2015

सामाजिक कार्यकर्त्या, समीक्षक
पत्ता –
संपर्क – मो. ९८२०६९३६६८

पुष्पा भावे या दलितांसंबंधितांच्या आणि स्त्रियांसंबंधीच्या चळवळींमध्ये मानवतावादी दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवणा-या समाजव्रती आहेत. अध्यापनाबरोबरच नाटक, सिनेमा, समीक्षा, समाजकारण, राजकारण या साऱ्यांशीच त्या जोडल्या गेल्या आहेत. आणीबाणी, दलित साहित्याचा बहर, ग्रंथाली चळवळ, समांतर सिनेमा, छबिलदासचे नाट्यप्रयोग, स्त्री संघटना, दलितांचे लढे, गिरणी कामगार प्रश्न या सगळयांशीच स्त्री म्हणून, माणूस म्हणून, चळवळीतील एक जागरुक कार्यकर्ती म्हणून त्या सहभागी झालेल्या आहेत. विद्यापीठातील ‘ स्त्री अभ्यास शाखा’, ‘ सामाजिक कृतज्ञता निधी’ , ‘ केशव गोरे स्मारक ट्रस्ट’, ‘य. दि. फडके संशोधन केंद्र’, ‘साने गुरुजी ट्रस्ट’ ‘अनुवाद सुविधा केंद्र’, ‘भारत-पाकिस्तान फोरम’, ‘ मृणाल गोरे दक्षिण आशियाई केंद्र’ अशा विविध संस्थांत त्या सदैव कार्यरत असतात. २००५ च्या नोबेल शांतता पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या जगभरातील एक हजार स्त्रियांपैकी त्याही एक आहेत. या सोबतच अनेक संपादित पुस्तकांत त्यांचे साहित्य, समीक्षा, राजकारण, शिक्षण अशा विषयांवरचे अभ्यासपूर्ण लेखन समाविष्ट झालेले आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2015- पुष्पा भावे