Select Page

राजकुमार तांगडे

साहित्य : रा. शं. दातार नाट्य पुरस्कार :2014

कवी, नाटककार
पत्ता –
संपर्क – मो. ९४०३०१०२९१

राजकुमार तांगडे हे आजच्या पिढीच्या नाटककारांपैकी एक. लोकशाहीर संभाजी भगत यांच्या संकल्पनेवरील ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक त्यांनी लिहिलेले महत्त्वाचे नाटक. कुमारवयात कविता, ‘माळावरचं फूल’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. हुंडाबळीच्या समस्येवरील ‘बहीण माझी प्रीतीची’ हे तांगडे यांचे पहिल्यांदा रंगमंचावर आलेले नाटक. त्यानंतर उस उत्पादकांची व्यथा मांडणारे ‘काय दिलं स्वातंत्र्याने?’, वीज समस्येवरील ‘आकडा’ ही एकांकिका तर ग्रामीण राजकारण व महिलांच्या तिस-या अपत्याच्या समस्येवरील ‘हितशत्रू’ ही नाटके त्यांनी लिहिली. ही नाटके सामाजिक प्रश्नांना थेट भिडणारी व आव्हान देणारी होती. प्राथमिक शिक्षणातील दुरावस्था मांडणारा ‘पिन्टी’, शेतकरी आंदोलनावरील ‘चक्काजाम’ तर मानवी स्वभावावर भाष्य करणारे ‘स्वर्गारोहण’ ही नाटकेही अशाच संवेदनांनी भारलेली होती. नाटककार मकरंद साठे व रंगधर्मी अतुल पेठे यांच्या बरोबरीने नाट्यरुपांतर केलेले ‘दलपतसिंग येती गावा’ या नाटकामधील त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. तो त्यांना प्रगल्भतेकडे नेणारा प्रवास ठरला.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2014- राजकुमार तांगडे