महाराष्ट्र फाऊंडेशन विशेष पुरस्कार (डिजिटल पत्रकारिता) सन्मान २०२१- राम जगताप, डोंबिवली
राम जगताप यांनी मुद्रितशोधनापासून सुरुवात करत पत्रकारिता, लेखन, संपादन असे टप्पे पार करत एक अभ्यासू, चिकित्सक आणि चोखंदळ पत्रकार म्हणून नाव कमावले आहे. ‘अक्षरनामा’ सारखे फीचर पोर्टल सलग पाच वर्षे यशस्वीपणे चालवून त्यांनी मराठीत अलीकडेच सुरु झालेल्या डिजिटल फीचर पोर्टलच्या माध्यमात आपले एक स्थान निर्माण केले आहे.मराठा समाज: वास्तव आणि अपेक्षा’ , ‘मध्यमवर्ग उभा, आडवा, तिरपा’, ‘कर्ती माणसं,’ ‘नोटाबंदी – अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक’, ‘मायलेकी बापलेकी’ अशी त्यांची एकट्याची किंवा सहलेखक-संपादकांसह असलेली पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातून संदर्भांचा शोध घेत, प्रश्न विचारत मुळापर्यंत जाणं, चिकित्सा करणं आणि सत्याशी इमान राखणं हा पत्रकारितेचा धर्म कसोशीने पाळलेला दिसून येतो.