
रमेश गावस
कार्यकर्ता पुरस्कार 2015 : प्रबोधन
सामाजिक कार्यकर्ते
पत्ता –
संपर्क – मो. ९२७००८५१०५
गोव्यातील खाणींच्या प्रश्नांवर लढणारे पर्यावरणवादी अशी रमेश गावस यांची ओळख आहे. गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला गेलेला खाण व्यवसाय हा अती हव्यासापोटी बेकायदा डोंगरफोड करु लागला. यामुळे जंगल, डोंगर, वन्यजीव संपदा नष्ट होउन लागली. अनियंत्रित उत्खननामुळे पर्यावरण धोक्यात आले. धनदांडग्या खाणमालकांच्या विरोधात कोणीही अवाक्षर काढत नव्हते. एकप्रकारची दहशतच होती. अशात रमेश गावस निर्भिडपणे कोर्टात गेले आणि न्याय मागू लागले. या साऱ्या प्रश्नांचा अभ्यास करुन स्वत: युक्तिवाद करत त्यांनी या अंदाधुंदीविरुध्द आवाज उठवला. त्याची परिणती गोव्यातील खाणव्यवसायावर सुप्रिम कोर्टाने बंदी घातली. खाणी विरोधातला हा लढा सतत सात वर्षे चालू होता. या सर्व काळात कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता, धमक्यांना न घाबरता गावस उभे राहिले. प्रतिकूल वातावरण असूनही त्यांनी आपली विचारांची निष्ठा सोडली नाही. एक शिक्षक, राष्ट्र सेवा दलातील कार्यकर्ता म्हणूनही ते कार्यरत आहेत. खाण मालकांच्या विरोधात यांबरोबरच अंधश्रध्दा निर्मुलन, समता आंदोलन, भारत जोडो आंदोलन, नवनिर्माण अभियान, आंतरजातीय लग्नांची चळवळ या समाजप्रबोधनात्मक आंदोलनांचे नेतृत्वही गोव्यात त्यांच्याकडेच होते. आजही आहे.