रमेश हरळकर
महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य पुरस्कार– २००४
हाडाचा कोकण्या आणि दुसऱ्याच्या जीवाला टोचण्या लावणाऱ्या रमेश हरळकरला आपण टाळूच शकत नाही. कधी तो तासन्तास कचऱ्याची कहाणी सांगत राहील. कधी बौद्धजन पंचायतीच्या चक्रव्यूहात नेऊन सोडील तो बरोबर नसला, तरी त्याची भुणभुण आपली पाठ सोडत नाही.
