Select Page

रुबिना पटेल

कार्यकर्ता : मुस्लिम महिलांच्या प्रबोधनासाठी

सामाजिक कार्यकर्त्या
संपर्क – मो. ९९२३१६२३३७

मुस्लिम महिलांच्या प्रबोधनासाठी सामाजिक कार्यकर्त्या रुबिना पटेल निर्भयतेने लढा देत आहेत. धर्म आणि पुरुषी अहंकाराविरूद्ध सामना करणाऱ्या ‘लढाऊ महिला’ म्हणूनच त्या ओळखल्या जातात. धर्माचा आधार घेत महिलांच्या अधिकारांवर वर्चस्व गाजवण्या-यांविरूद्ध रुबिना पटेल खंबीरपणे ऊभ्या राहतात. स्वत:सारख्या पीडित महिलांच्या – विशेषत: मुस्लिम महिलांच्या हक्कांसाठी ‘मुस्लिम महिला मंचा’ ची स्थापना त्यांनी केलेली आहे. नागपूरजवळच्या उमरेड तालुक्यात अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. शिक्षणाची आवड असल्याने उपजत जिज्ञासू वृत्ती होती. पण व्यसनी वडिलांनी लहान वयातच त्यांचा निकाह करवला. पती शिक्षक असूनही पत्नीच्या बाबतीत सनातनी होते. शारीरिक, मानसिक छळ नित्याचाच. मुले लहान असतानाच एके दिवशी अचानक नव-याने तलाक दिला आणि त्या मनाने उध्वस्त झाल्या. पण त्यांनी धैर्याने प्रसंगाचा सामना केला. स्वत:सोबतच पिडित महिलांच्या बाजूने शरियत कायदा, बुरखा पद्धती, बहुपत्नीत्व अशा प्रथांविरूद्ध आवाज उठवला. आंदोलने, चळवळी यातून महिला अत्याचाराकडे समाजाचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला. ‘स्त्रियांचा सन्मान’, ‘लिंगभेदभाव नष्ट करणे’ हेच रुबिना पटेल यांचे जीवितकार्य बनलेले आहे. 

साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २०१७- रुबिना पटेल