समाजकार्य कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार २०२४ –
डॉ. रूपेश पाटकर (सिंधुदुर्गं) मनोविकारतज्ज्ञ
(पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.)
डॉ. रूपेश पाटकर पर्यावरण चळवळ, कामगार चळवळ, कुपोषण, मानसिक आरोग्य, व्यसनमुक्ती, कुमारवयीन मुलांचे भावनिक आरोग्य, आदी क्षेत्रात गेली बावीस वर्षे कार्यरत आहेत. विविध सामाजिक प्रश्नांवर ते सातत्याने वर्तमानपत्रातून लिखाण करतात. ‘माझ्या आईची गोष्ट’, ‘पर्यावरणीय बुद्धिमत्ता’, ‘ओपन युवर हार्ट’, ‘स्वभावचित्र’, ‘अर्जमधले दिवस’ (गोव्यातील रेड लाईट एरियातील संस्थेत काम करतानाचे अनुभव), ‘अंदमानातील क्रांतिकारक’ आदी पुस्तकांचे लिखाण त्यांनी केले आहे. पर्यावरणविषयक जागृतीसाठी व्याख्याने, लेख, पुस्तिका इ. माध्यमातून ते लोकप्रबोधन करतात.