
सई परांजपे
अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार २०१७: सय : माझा कलाप्रवास’ (आत्मकथनात्मक ग्रंथ )
नाटककार, लेखिका, दिग्दर्शिका, अभिनेत्री, निर्माती
स्वत:ची प्रतिमा दीर्घकाळ टिकविणा-या, कलाक्षेत्रात धाडसी प्रयोग करणा-या सई परांजपे यांनी आपल्या ‘सय : माझा कलाप्रवास ’ या आत्मकथनात्मक पुस्तकात मांडले आहेत. सई परांजपे हे कला माध्यमांशी जोडलं गेलेलं नाव. आकाशवाणी, बालरंगभूमी, हौशी-व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन मालिका अशा माध्यमातून त्यांची लेखणी बहरत राहिली आहे. लेखिका, दिग्दर्शिका, अभिनेत्री, निर्माती अशा विविध स्तरांवर त्या मराठी व हिंदी प्रेक्षकांना भेटत राहिल्या. रँग्लर र. पु. परांजपे यांची नात तर पुरोगामी विचारांच्या मातोश्री शकुंतला परांजपे यांच्या संस्कारात सई मोठया झाल्या. यातूनच सामाजिक समस्यांवर आधारित चित्रकृती, नाट्यकृतीं त्यांच्याकडून साकारल्या गेल्या. आकाशवाणीवरील बालोद्यान, बालनाट्य, हिंदी भाषेत मराठी लोकनाटयाचा प्रयोग, पुण्यातील एफ.टी.आय.आय. मधील अध्यापन यासोबतच मराठी व हिंदी चित्रपट, मालिका, लघुपट, बालचित्रपट माध्यमातून केलेली भरीव कामगिरी. चित्रपट, लघुपटांना राष्ट्रीय पुरस्कार तर देशातील सर्वोच्च अशा ‘पद्मभूषण’ पुरस्काराच्या त्या मानकरी आहेत. स्वत:ची प्रतिमा दीर्घकाळ टिकविण्या-या परांजपे यांनी ‘जास्वंदी’, ‘माझा खेळ मांडू दे’, ‘नांदा सौख्य भरे’ अशी नाटके, ‘चुडिया’ हा राष्टष्ट्रीय पारितोषिक विजेता चित्रपट, ‘कथा’, ‘स्पर्श’, ‘चष्मेबहाद्दूर’, ‘साज’ असे चित्रपट, तर लहान मुलांसाठी ही नाटके असे प्रदीर्घ कार्य त्यांनी केले आहे. साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…
पुरस्कार विजेता ग्रंथ
महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २०१७- सई परांजपे
