Select Page

सतीश काळसेकर

ग्रंथ पुरस्कार 2012: अपारंपरिक

कवी, लेखक, ग्रंथमित्र
पत्ता – कबीरा, चित्रकुटी कलाग्राउंड, मु.पो. आंबेघर, ता. पेण, जिल्हा रायगड
मो. ९४२२६८९५५९

सतीश काळसेकर अनियतकालिकांच्या चळवळीतले खंदे समर्थक आहेत. वाचनाची प्रचंड आवड असलेल्या काळसेकर यांनी आपल्या ‘वाचणा-याची रोजनिशी’ या पुस्तकातून त्यांच्या अफाट वाचनासंदर्भात स्वच्छंद असे लेखन केले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषातून कविता, कादंबरी, कथा, ललितबंध, निबंध, लेख, चरित्र, आत्मचरित्र, गौरवग्रंथ, संदर्भग्रंथ, प्रवास वर्णनं, वाचनविषयक मुलाखती, भाषणं आणि समीक्षा अशा विषयांवर त्यांनी लिहिले आहे. का वाचावे, काय वाचावे, कसे वाचावे या संदर्भात ही ‘रोजनिशी’ वाटाडयाचे काम करते. यात अवतीभवतीच्या परिस्थितीचे, समाजाचे, राजकीय-आर्थिक स्थितीचे, जगाच्या समकालीन अवस्थेचे संदर्भ आहेत. संतवाड्मय, इतिहास, विज्ञान, चित्रकला, शिल्पकला, संगीत, नाटक, चित्रपट या सर्व विषयांचा आवाका आहे. थोडक्यात म्हणजे वाचनसंस्कृतीचा विकास आणि विस्तार करण्यासाठी प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे. कवी म्हणून काळसेकर यांचे ‘इंद्रियोपनिषद’, ‘साक्षात’, ‘विलंबित’ हे कवितासंग्रह त्यांच्या चोखंदळ प्रतिभेची साक्ष देणारे आहेत.

अंकातील मुलाखत वाचा…

पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ  

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2012- सतीश काळसेकर