
सत्यपाल महाराज
कार्यकर्ता : प्रबोधन पुरस्कार 2011
संत
पत्ता – मु.पो., तालुका – अकोट, स्टेशन रोड, जिल्हा अकोला
संपर्क – ९४२३१२८१४३
‘संत सत्यपाल महाराज सिरसोलीकर’ हे ‘प्रबोधनकार संत’ म्हणून ओळखले जातात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा वारसा चालविणारे म्हणून सत्यपाल महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. समाजातील अंधश्रद्धा, जातीयवाद, जुन्या रूढी-परंपरा, हुंडाप्रथा, कुपोषण, दारु, अमली पदार्थांचे व्यसन, एडस्, शेतकरी आत्महत्या अशा समाजातील विविध अनिष्ट बाबींवर ते आपल्या प्रभावी कीर्तनातून लोकजागृती करतात. समाजप्रबोधन करताना ते रक्तदान, नेत्रदान, वृक्षारोपण, पाणी अडवा पाणी जिरवा, महिला सबलीकरण, स्वदेशीचा स्वीकार, साक्षरता, सामुदायिक विवाह, मूल्य शिक्षण अशा चांगल्या गोष्टींचा आपल्या कीर्तनातून प्रसार करतात.