
सय्यदभाई
विशेष ग्रंथ पुरस्कार : 2011
सामाजिक कार्यकर्ते, लेखक
पत्ता – महाराष्ट्र ग्राइंडिंग मिल, बु-हानी इंडस्ट्रियल इस्टेट, कोंढवा बुदु्रक, पुणे ४११ ०४८
संपर्क – ९८२२११७८७६
‘मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या’माध्यमातून केलेल्या आपल्या सामाजिक कार्याचे सय्यदभाई यांनी केलेले कथन ’ दगडावरची पेरणी’ पुस्तकात आहे. कार्यकत्यार्च प्रांजळ अनुभव यात आहेत. ‘मुस्लिम सत्यशोधक समाजा’ची स्थापना करणा-या हमीद दलवाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सय्यदभार्इंवर विशेष प्रभाव होता. दलवाई यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या कार्याचा वसा सय्यदभाई यांनी पुढे चालवला. मुस्लिम सजाजातील सुधारणा, तोंडी तलाकच्या प्रश्नांविषयीचा लढा त्यांनी सातत्याने चालू ठेवला आहे.