Select Page

ग्रंथ पुरस्कारः (वैचारिक / अपारंपरिक) २०२२
शरद बाविस्कर, नवी दिल्ली
‘भुरा’ (आत्मकथन)

पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे

‘भुरा’ या प्रा. शरद बाविस्कर यांच्या आत्मकथनाने मराठी साहित्यात अचंबित करणारं यश मिळवलंय. त्यांच्या पहिल्याच पुस्तकानं त्यांनी जाणकार आणि सर्वसामान्य अशा दोन्ही प्रकारांचे लक्ष वेधून घेतले आहे. धुळे जिल्ह्यातल्या एका खेड्यात कोरडवाहू शेतकऱ्याच्या घरातून सुरू झालेला हा प्रवास आहे. शेतमजुरी करण्यापासून सुरूवात करणाऱ्या या तरुणाची ज्ञानाची भूक एवढी आहे की तो अभ्यासाचा अतीव ध्यास घेऊन युरोपातील तीन आणि भारतातील दोन ‘मास्टर्स’ पदव्या प्राप्त करतो. ‘जेएनयू’ मध्ये फ्रेंच तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक होतो. भाषाशास्त्र, सामाजिक भाषाशास्त्र, फ्रेंच साहित्य, संस्कृती अध्ययन आणि तत्त्वज्ञान हे शरद बाविस्कर यांचे अभ्यासविषय आहेत. आपली जातजाणीव ओलांडून मार्क्स, अल्थुझर, ग्राम्शी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपर्यंत पोहोचूनही स्वतंत्रपणे आपले सामाजिक वास्तव संवेदनशीलतेने आणि तेवढ्याच कठोर वैचारिक शिस्तीने तपासणाऱ्या प्रा. शरद बाविस्कर यांचे हे प्रांजळ आत्मकथन आहे.