Select Page

रा.शं.दातार नाट्य पुरस्कार २०२४ –
वामन पंडित, कणकवली (संपादक, ‘रंगवाचा’)
(पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.)

शरद जावडेकर हे अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेचे कार्याध्यक्ष आणि लोकनेते भाई वैद्य फाउंडेशनचे प्राचार्य आहेत. गेली वीस वर्षे ते भाई वैद्यांबरोबर शिक्षण हक्क चळवळीत व शिक्षण हक्क सत्याग्रहात सहभागी आहेत. विद्यार्थीदशेपासून त्यांचा चळवळीत सहभाग राहिला आहे. आणीबाणीविरोधी चळवळीत येरवडा कारागृहात काही महिन्यांसाठी ते तुरुंगवासात होते. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातही त्यांचा सहभाग होता.
शरद जावडेकर हे अर्थशास्त्राचे अभ्यासक असून त्यांनी तीस वर्षे उच्च महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. केजी ते पीजी शिक्षण मोफत, गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक होण्यासाठीचा संघर्ष त्यांच्या लेखनातून आणि कामातून दिसून येतो. शिक्षण हक्क पत्रिकेचे संपादक म्हणून ते गेली बारा वर्षे कार्यरत आहेत. शिक्षण, धर्मनिरपेक्षता, असंघटित कामगारांचे प्रश्न या विषयांवर साप्ताहिक साधना, महाराष्ट्र टाइम्स, दैनिक सकाळ इत्यादीमध्ये ते सातत्याने लिखाण करतात. नवीन शैक्षणिक धोरणातील त्रुटींवर नेमकेपणाने बोट ठेवून व्याख्याने, लेख आणि पुस्तकांमधून विचार मांडत असतात. ‘सामाजिक परिवर्तन: चिकित्सा आणि भवितव्य’ या भा. शं. भणगे गौरव ग्रंथाचे, तसेच ‘बहुजनांचे शिक्षण: वास्तव व अपेक्षा’, ‘समाजवादी शिक्षण हक्काचा लढा’ या पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे. महिला, आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक आणि वंचित समूहांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळावा यासाठी चार दशकाहून अधिक काळ ते संघर्ष करत आहेत.