श्रमिक महिला विकास संघ,
महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य पुरस्कार – २००५
वसई हे तालुक्याचं गाव असलं तरी तसं छोटंच. पण जागतिकीकरण, बाजारातील मंदी , तशात निर्माण झालेली वीज टंचाई यांची झळ या छोट्या गावालाही पोचलीच.अनेक लघ-उद्योग बंद पडले. अनेक जण बेकार झाले.आणि मग व्यसनांपायी होतं नव्हतं तेही घालवून बसले अशा गोष्टींचा परिणाम कुटुंब स्वास्थ्यावर झाल्याशिवाय कसा राहील!
