Select Page

श्रीपाद नारायण पेंडसे

महाराष्ट्र फाउण्डेशन पुरस्कार १९९६

श्रीपाद नारायण पेंडसे हे स्वातंत्र्योत्तर काळातील एक श्रेष्ठ कादंबरीकार आहेत.  मराठी ‘एल्गार’ ही त्यांची पहिली कादंबरी १९४९ मध्ये प्रसिद्ध झाली. तेव्हापासून गेली चार तपे त्यांचे कादंबरीलेखन सातत्याने सुरू आहे. ‘रणांगण’, ‘बळी’, ‘पाणी’, ‘बनगरवाडी’, ‘क्षिप्रा’, ‘धग’, ‘सावित्री’, ‘कोसला’ यांसारख्या मराठीतील श्रेष्ठ कादंब-यांच्या जोडीला पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बाप’, ‘हत्या’, ‘रथचक्र’, ‘लव्हाळी’ या कादंब-यांची नावे घ्यावी लागतील एवढे त्यांचे मराठी कादंबरीक्षेत्रातील स्थान आहे. मराठी कादंबरीला एक जोराचा धक्का देऊन आपण गती दिली हे त्यांचे म्हणणे बरयाच अंशी मान्य व्हावे, एवढे कादंबरीकार पेंडसे यांचे त्या क्षेत्रातील कर्तृत्व आहे, हे मान्य करायला हरकत नाही. ‘गारंबीचा बापू’ या त्यांच्या कादंबरीला नागपूरच्या नॅशनल लायब्ररीने सर्वोत्तम कादंबरीचा पुरस्कार प्रदान केला तर, ‘रथचक्र’ला १९६४ मध्ये ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. पेंडसे यांच्या कादंबरीला अनेक समीक्षकांनीही गौरविले आहे.

अंकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार १९९४ – अनराधा पाटील