श्रीकांत देशमुख
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००४
‘कविता ही सर्वोत्तम शब्दांची सर्वोत्तम व्यवस्था असते’ असं कोलरिजनं सांगून ठेवलंय. डब्ल्यू. एच. ऑडेननं, ‘चांगल्या कवितेत रचनेचं सौंदर्य, नेटकी मांडणी, शब्दांचा मितव्यय आणि सर्वात्मकता असते.’ असं म्हटलंय. या दोन्ही निकषांवर तंतोतंत उतरणारी मराठी कविता पु. शि. रेगे यांनी लिहिली. यातला पहिला निकष झुगारत आणि दुसऱ्यावर आरूढ होत श्रीकांत देशमुख यांनी ‘आषाढ माती’तली कविता लिहिली आहे. तरीही त्यांनी कविताच लिहिली आहे हे खास.
