
श्रीनिवास कुलकर्णी
समाजकार्य पुरस्कार 2010 । असंघटित कष्टकरी
सामाजिक कार्यकर्ते
पत्ता – बचपन बचाओ आंदोलन, गंगाखेड, जिल्हा परभणी ४३१ ५१४
संपर्क – मो. ९८९०३४४५४७
रचनात्मक संघर्ष समितीच्या माध्यमातून परभणी जिल्हयातील गंगाखेड, अहमदपूर, लोहा या तालुक्यामध्ये ऐंशीच्या दशकात मोठे काम उभे करणारे समाजव्रती म्हणजे श्रीनिवास कुलकर्णी. भूमिहीन गरिबांना गायरान जमिनी मुक्त करण्याच्या प्रयत्नांमधून सुमारे आठशे कुटुंबांना जमिनी त्यांनी परत मिळवून दिल्या. लातून परिसरातील भूकंपानंतर पुनर्वसनाचे काम केले. कष्टकरी सभेच्या माध्यमातून अतिक्रमित जमिनींचे प्रश्न, घरांचे प्रश्न, वयोवृध्द निराधार वृध्दांचे प्रश्न, परित्यक्ता महिलांचे संघटन व त्यांचे पुनर्वसन आदी प्रश्नांवर कुलकर्णी दीर्घकाल काम करत आहेत. १९९७ साली ‘बचपन बचाओ’ आंदोलनाचे काम त्यांनी सुरु केले. जागृती, पुनर्वसन, शिक्षण ही त्रिसूत्री अंगिकारून बालमजुरी हटविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. नांदेड व परभणी जिल्हयातील पारधी समाजाच्या विकासासाठीही त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.