श्याम मनोहर
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार- २००४
श्याम मनोहर हे लेखक मोजके पण मौलिक लिहिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आणि बाकीचे सगळे, बिनमौजेच्या गोष्टी हे कथासंग्रह यकत, हृदय, प्रेमाची गोष्ट? ही नाटके आणि हे ईश्वरराव… हे पुरुषोत्तमराव, शीतयुद्ध सदानंद, कळ, खूप लोक आहेत या कादंबऱ्या, या त्यांच्या प्रकाशित लेखनापैकी कोणतेही लेखन वाचल्यानंतर वाचकाला हा लेखक मराठीतील अनन्य लेखक आहे हे जाणवल्यावाचून राहात नाही
