प्रतिभा शिंदे
महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २००५
सर्वार्थाने जंगलावर जगणाऱ्या आदिवासीला तथाकथित प्रगतीच्या नावाखाली फार वर्षांपासून विस्थापित केले जात आहे. या आदिवासींच्या कामात जसे बाबा आमटे आहेत; तशा मेधाताईही आहेत तशीच संघर्षासोबत नवनिर्माणाची काळजी घेणारी प्रतिभा शिंदे आहे. तिची पुनर्वसन संघर्ष समिती, आता साऱ्यांना माहीत झाली आहे.
