स्त्री मुक्ती संघटना
महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार– २००७
स्त्री मुक्ती संघटनेचा जन्म, कोणत्याही चळवळीप्रमाणे, सामाजिक गरजेमधून झाला; परंतु संघटनेचे वैशिष्ट्य असे, की तिची नंतरच्या काळातील जोपासना व तिचा विकास-विस्तार जाणीवपूर्वक व बराचसा योजनेने झाला. त्या पाठीमागे शारदा साठे व ज्योती म्हापसेकर यांची कर्तबगारी आहे.
