
सुभाष वारे
समाजकार्य पुरस्कार 2010 प्रबोधन
सामाजिक कार्यकर्ते
पत्ता – ‘खोज’, गौरखेड कुंभी, ता. अचलपूर, जिल्हा अमरावती ४४४८०६
संपर्क- मो. ९८९०३५९१५४
‘खोज’ संस्थेच्या माध्यमातून व्यक्ती व कार्यकर्ता म्हणून मेळघाटातील आदिवासींसाठी पूर्णवेळ कार्यरत असलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे बंडया साने. आदिवासींना सरकारी दवाखान्यात मिळणारी असुविधा, अनास्था, शाळा प्रवेश, शिक्षण रस्त्यांचे प्रश्न, विजेचा प्रश्न, रेशनिंगची समस्या, रोजगाराचा प्रश्न, वेठबिगारांचा मुद्दा, महिलांवरील अत्याचार, युवक विकास, शेती विकास अशा विविध सामाजिक व संवेदनशील प्रश्नांवर ते सातत्याने कार्यरत असतात. आदिवासींसाठी, मेळघाटासाठी तेथील कुपोषणासाठी असलेल्या सरकारी योजनांची साने यांना इत्यंभूत माहिती असते. अनेक सरकारी अधिकारी आणि कचे-यांना ते संदर्भ म्हणून ही माहिती पुरवितात. प्रशासन आणि आदिवासी यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहेत बंडया साने.