सुनीलकुमार लवटे
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००७
‘अनाथ’ या शब्दाची आणि त्यात अनुस्यूत असलेल्या अर्थाशयाची फेरव्याख्या करायला भाग पडावं अशा वजनाचं हे आत्मकथन, कोल्हापूरचे डॉ. सुनीलकुमार लवटे यांचं. त्यांच्या मते हे आत्मकथन नव्हेच. ते आहे’कन्फेशन.’ एका अर्थाने त्याची प्रचीती पुस्तकात मिळत जाते.
