महाराष्ट्र फाऊंडेशन ग्रंथ पुरस्कार (अ-पारंपरिक/ वैचारिक) साहित्यकृती : ‘टिपंवणी’ सन्मान २०२१- डॉ. सिसिलिया कार्व्होलो, वसई
या वर्षीचा महाराष्ट्र फाउंडेशनचा सामाजिक कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार सुनीता भोसले यांना जाहीर झाला आहे. पारधी समाजात जन्माला आलेल्या सुनीता भोसले यांचे बालपण अतिशय हलाखीत गेले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी एकनाथ आवाड यांच्या ‘मानवी हक्क अभियानासाठी’ काम करण्याचा निर्णय घेतला. यातून त्यांना आपल्या समाजाच्या एकतेची ताकद समजली. आपले हक्क समजले. त्यांनंतर त्या पूर्णवेळ कार्यकर्त्या झाल्या.मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून त्यांनी अट्रॉसिटी, आयपीसीची विविध कलमे, गायरान जमिनीचे हक्क, पोलिसांशी आणि प्रशासकीय यंत्रणेशी संवाद असे प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण केले. त्यानंतर त्या अतिशय आत्मविश्वासाने शिरूर तालुक्यातील आदिवासी, भटके, भिल्ल, पारधी, अनुसूचित जाती-जमातींच्या लोकांना न्याय देण्यासाठी कार्य करू लागल्या.
त्यानंतर पारधी व भटक्या समाजाला शिक्षण, आरोग्य, अन्याय अत्याचार निवारण आणि नागरिकत्वाचे पुरावे मिळावेत यासाठी २०१२ साली त्यांनी ‘क्रांतिसंस्था’ स्थापन केली. आज जवळपास १२० विद्यार्थी त्यांनी शिक्षणासाठी दत्तक घेतले आहेत.