
सुनीती सु. र.
कार्यकर्ता पुरस्कार 2012 : प्रबोधन
सामाजिक कार्यकर्त्या
पत्ता – ६, राघव, श्रीरघुराज सहनिवास, सिंहगड रस्ता, पुणे ४११ ०३०
संपर्क – मो. ९४२३५७१७८४
पुण्याजवळील ‘लवासा’ विरोधी आंदोलनातून या प्रकल्पातील सत्य समोर आणाणा-या अभ्यासू व लढाऊ वृत्तीच्या कार्यकर्त्या म्हणून सुनीती सु. र. परिचित आहेत. ‘समता आंदोलन’ या संघटनेद्वारे परित्यक्ता, गिरणी कामगार, सफाई कामगार अशा सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याचे कार्य सुनिती यांनी सातत्याने केलेले आहे. नर्मदा बचाओ आंदोलनात त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. ‘शांतता, न्याय, लोकशाही’ हे ब्रीद असलेल्या पर्यायाी विकासनीतीची मांडणी करणा-या जनआंदोलनाच्या त्या राष्ट्रीय समन्वयक आहेत. ‘आंदोलन : शाश्वत विकासासाठी’ या मुखपत्राच्या त्या कार्यकारी संपादिका आहेत. पर्यावरण आणि पुनर्वसन या दोन्ही गोष्टीत अक्षम्य चुका करणा-या ‘लवासा’ विरोधात त्यांनी सरकारविरुद्ध उभे केलेले आंदोलन आणि दिलेला लढा महत्त्वाचा आहे.