
सुषमा देशपांडे
रा. शं दातार नाट्य पुरस्कार 2012
नाटककार, अभिनेत्री
पत्ता – ३९/३८, एरंडवणा, ३ प्रसाद अपार्टमेंटस्, प्रभात रोड, गल्ली नं. ९, पुणे ४११ ००४
संपर्क- ९४२२३०६७०८
सामाजिक परिवर्तनाच्या चळवळींशी स्वत:ला जोडून घेउन आपल्या नाटयकृतींमध्ये स्त्री-स्वातंत्र्याचा एल्गार पुकारणाऱ्या सर्जनशील कलावंत म्हणून सुषमा देशपांडे ओळखल्या जातात. ‘व्हय मी सावित्रीबाई’, ‘तिच्या आईची गोष्ट’ हे त्यांनी लिहिलेले आणि सादर केलेले दोन एकपात्री प्रयोग विलक्षण गाजले. प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी केलेल्या भूमिकाही गाजल्या. त्यांनी संत स्त्रियांच्या साहित्यावर संशोधन करुन लिहिलेले आणि संत स्त्रीयांच्या आयुष्यातील प्रसंग सादर करणारे संगीतप्रधान नाटक म्हणजे ‘बया दार उघड’. यात स्त्री-स्वातंत्र्याच्या चळवळींवरचा धागा बाराव्या शतकातील संत कवयित्रींशी जोडला गेला आहे. स्त्रिला मोकळेपणाने जगू देण्यास इथल्या व्यवस्थेने शतकानुशतके नाकारले, हे देशपांडे यांनी अधोरेखित केले आहे. निरक्षर स्त्रियांनीही स्वातंत्र्यासाठी विद्रोह केलेला आहे, प्रसंगी प्राणार्पण केलेले आहे.. नाटकातील प्रसंगांतून हे प्रभावीपणे समोर येते. स्त्रियांना जगण्याची उमेद आणि बळ देणारे ‘बया दार उघड’ हे नाटक आहे.