ते पुढे गेले
महाराष्ट्र फाउंडेशन रा. शं. दातार नाट्य पुरस्कार – २००८
ते पुढे गेले’ ह्या नाटकातही जित्याजागत्या वास्तवाशी नाते तोडून त्यावर नाटककाराने भाष्य केले आहे. चार मेलेल्या व्यक्ती मरणोत्तर अवकाशात जगत आहेत अशी इथे कल्पना आहे. ह्या दोन व्यक्ती मेलेल्या आहेत तरीही त्या जिवंतपणे होत्या त्याच शारीरिक, भावनिक, वैचारिक अवस्थेत आहेत. जिवंतपणीच्या काही भावना गोठून गेल्या आहेत इतकेच. बाकी सर्व होते तसेच आहे.
