Select Page

विजय दिवाण

समाजकार्य कार्यकर्ता सामाजिक प्रश्न : पुरस्कार २०१६

सामाजिक कार्यकर्ता
पत्ता –
संपर्क – मो. ९०२८३२१०६३

ग्रामीण भागातील उपेक्षित आणि गरजू समाज हा स्वावलंबी होण्यासाठी विजय दिवाण विविध उपक्रम राबवितात. गांधी-विनोबा-आंबेडकर या तीन महान व्यक्तिमत्त्वांच्या आचार विचारांचा, संघर्षाचा आशय ते त्यांच्या कृतीत आणण्याचा सदैव प्रय़त्न करत असतात. गेली तीन दशकांहून अधिक काळ ते स्वेच्छापूर्वक सामाजिक कार्य करत आहेत. जातीव्यवस्थेच्या दुष्टचक्रात अडकलेली काही गलीच्छ व्यावसायिक कामे शतकानुशतके विशिष्ट जातीतील लोकांनाच करावी लागतात. ढोर मेहनत करुनही त्यांना मिळणारी हीन वागणूक, कमी मोबदला, त्यांच्या कामाला नसलेली प्रतिष्ठा पाहून दिवाण अस्वस्थ झाले. त्यांनी मृत गुरांचे कातडे सोडविण्याचे काम स्वेच्छेने स्विकारले. जाती, वर्ण व्यवस्था संपुष्टात याव्यात यासाठीचे हे सकारात्मक पाऊल ठरले. जाती अंताच्या दिशेने विचार केला तर निसर्ग आणि माणूस, माणूस आणि समाज, समाज आणि व्यवस्था या तीनही स्तरावर प्रगती होईल, असा त्यांना विश्वास आहे. त्या दृष्टिने समाजातील विविध स्तरातील लोकांशी ते संवाद साधत असतात.

साधनेच्या पुरस्कार विशेषांकातील मुलाखत वाचा…

महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार २०१६ – विजय दिवाण