विलास भोंगाडे
महाराष्ट्र फाउंडेशन समाजकार्य गौरव पुरस्कार – २००४
महाराष्ट्र फाउण्डेशनचे पुरस्कार दर वर्षीप्रमाणे जाहीर झाले आणि आम्हा नागपूरवासीयांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. विलासचे नाव पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांमध्ये पाहून या परिसरातील सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांना अत्यंत आनंद झाला. असंघटित क्षेत्राशी जुळलेले हे नाव आज आंदोलनाची शक्ती बनले आहे.
