
विवेक सावंत
समाजकार्य : डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार 2014
माहिती-तंत्रज्ञान तज्ज्ञ
पत्ता –
संपर्क – मो. ९८२२०५२९१४
ज्ञानाधिष्टित समाजनिर्मितीच्या उद्देशाने विवेक सावंत यांनी ‘महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एमकेसीएल)ची स्थापना केली. विवेक सावंत यांनी या संस्थेद्वारे तंत्रज्ञान व नेटवर्र्किंग क्षेत्रात शिक्षणक्रांती केली. डॉ. विजय भटकर यांच्या सीडॅक संस्थेत ‘अॅडव्हॉन्स कम्प्युटर ट्रेनिंग स्कूल’च्या स्थापनेत विवेक सावंत यांचा पुढाकार होता. या स्कूलने तब्बल २५००० कम्प्युटर इंजिनिअर्स घडविले. कुठल्याही ज्ञानशाखेचा पदवीधर कम्प्युटर इंजिनिअर होऊ शकतो, हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्टय होते. या प्रक्रियेत विवेक सावंत प्रथमपासून होते. त्यानंतर ‘इंडियन इन्स्टिटयूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नोलॉजी’ या संस्थेसाठी सावंत यांनी सेंट्रल सर्व्हरची निर्मिती केली. या सर्व्हरचे स्वरुप लायब्ररीसारखे होते. जगभरातील ज्ञानवंतांचे लेक्चर्स यात साठवून ठेवले जात. ज्ञानविस्तारात तंत्रज्ञानाचे, नेटवर्र्किंगचे महत्त्व जाणून सावंत यांनी २००१ दरम्यान ‘एमकेसीएल’च्या अभ्यासक्रमातून लोकांना संगणकसाक्षर बनविण्याचे व्रतच घेतले. आज त्यांची संस्था एक उत्तम मॉडेल म्हणून विकसित झाली आहे. ती सरकारच्या पाठिंब्याने सुरु केली तरी ती सरकारी कंपनी नाही. सरकारी अनुदान न घेता माफक आर्थिक फायदा मिळविणारी कंपनी आहे. कंपनीचा प्रमुख हेतू समाजविकास हाच असल्याने होणा-या नफ्याची सामाजिक प्रकल्पात फेरगुंतवणूक होते. मोठया शहरातच नाही तर खेडयापाडयात व देशभरातही ती स्थिरावली आहे. शासनाचे सहकार्य मिळवूनही स्वायत्तता कशी अबाधित ठेवता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे विवेक सावंत यांच्या कल्पनेतून साकारलेले एमकेसीएल. आजवर कोटयावधी विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
अंकातील मुलाखत वाचा…
पुरस्कार विजेते पुस्तक/ग्रंथ
महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार 2014- विवेक सावंत