यशवंत मनोहर
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २००३
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही; सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे’ या कवितेने आणि ही कविता ज्या संग्रहात आहे त्या ‘उत्थानगुंफा’ (१९७७) या आपल्या पहिल्याच कवितासंग्रहाने यशवंत मनोहर यांनी सत्तरीच्या दशकातील मराठी कवितेवर आपली नाममुद्रा उठवली. त्या संग्रहातील, आक्रमक गद्यात्म मुक्त शैलीतील, कवितांतून विद्रोहाची प्रखर जाणीव व्यक्त झाली होती
