
योगिनी खानोलकर
समाजकार्य पुरस्कार 2010 । युवा कार्यकर्ता
सामाजिक कार्यकर्ती
पत्ता – मैत्री निवास, काकरवाडी, धडगाव, जिल्हा नंदुरबार
संपर्क – मो. ९४२३९४४३९०
नंदुरबार जिल्हयातील अक्राणी तालुक्यातील दुर्गम अशा आदिवासी पाडयांवर, नर्मदा बचाव आंदोलनाचे सात दिवसांचे युवा प्रशिक्षण शिबीरात सहभागी झाल्यानंतर योगिनी खानोलकर यांचे आयुष्यच बदलून गेले. अनन्वित हाल, अन्याय, अत्याचार सहन करणा-या आदिवासींचा अभ्यास यातूनच योगिनी यांनी सुरु केला. पूर्ण वेळ कार्यकर्त्या होण्याचा निर्णय अमलात आणत त्यांनी मुंबईच्या सुखावह जीवनशैलीचा त्याग केला. धडगाव या दुर्दम्य भागात त्या कार्यरत असतात. नर्मदेवरील महाकाय प्रकल्पांनी प्रकल्प क्षेत्रातील हजारो आदिवासींवर झालेल्या व होणा-या भयावह परिणामांच्या विरोधात, विविध प्रश्नांवर अनेकदा आदिवासींना संघटित करुन दिल्ली, मुंबई, भोपाळ इत्यादी महत्त्वाच्या शहरांमध्ये आंदोलने उभारण्याच्या कामात योगिनीं खानोलकर यांचा मोठा वाटा राहिला आहे. नर्मदा बचाव आंदोलनाने तेरा पाडयांवर १४०० मुलामुलींसाठी जीवनशाळा सुरु केल्या आहेत. या जीवनशाळांसाठी समन्वयक म्हणून खानोलकर यांनी केलेले कार्य अभूतपूर्व असेच आहे.