महाराष्ट्र फाऊंडेशन युवा पुरस्कार सन्मान २०२१-युवराज गटकळ, उस्मानाबाद
महाराष्ट्र फाउंडेशनचा सामाजिक कार्यकर्ता युवा पुरस्कार युवराज गटकळ यांना जाहीर झाला आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या जनआंदोलनामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आणि जोशात महाराष्ट्राच्या आणि एनएपीएमच्या वतीने शेतकरी प्रतिनिधींचे जे नेतृत्व केले त्याला तोड नाही.युवराज यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कष्टकऱ्यांची आहे. कोविड-१९ च्या काळात शेकडो किलोमीटर पायी जात असलेल्या हजारो श्रमिकांची हाक ज्यांनी ऐकली त्यात युवराज गटकळ आघाडीवर होते. ते पाहूनच मेधाताई पाटकरांनी त्यांच्यावर एनएपीएमची (राष्ट्रीय जनआंदोलनाची) जबाबदारी सोपवली आणि त्यांनी ती प्रामाणिकपणे निभावली. उच्च शिक्षण घेऊन त्यांनी जाणीवपूर्वक गांधींच्या चळवळीतील खडतर मार्ग निवडला. खादीचा अंगीकार, नशामुक्तीसाठी प्रयत्न, अनेक पदयात्रा, सायकल यात्रा, वाहन यात्रा आणि त्यातून प्रबोधन कृतिकार्यक्रम असा त्यांचा आजवरचा प्रवास आहे. युवराज गटकळ हा उद्याच्या चळवळींचा आश्वासक चेहेरा आहे यात शंका नाही.