डॉ. स. रा. गाडगीळ
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २०००
डॉ. स. रा. गाडगीळ यांच्या ‘शोकात्म विश्वरूप दर्शन : जीवन आणि साहित्य’ या ग्रंथाचा आवाका अतिशय व्यापक आहे. केवळ ‘ट्रॅजेडी’ (शोकात्म नाट्यकृती) एवढाच येथील विषय नाही, तर ‘शोकात्म विश्वरूप’ हा येथे मूळ विषय आहे. ग्रंथाच्या नावातच ‘जीवन आणि साहित्य’ असा शब्दप्रयोग केलेला आहे. मानवी जीवनातील शोकात्मतेचे स्वरूप, तिची कारणे आणि तिची साहित्यात प्रकटलेली कलारूपे असा हा व्यापक आलोक आहे. यामुळे या ग्रंथाने ‘ट्रेजेडी’ संबंधी होत असलेल्या साहित्यशास्त्रीय मीमांसेतील दीर्घकालचे अनेक वाद आपोआपच संपुष्टात आले आहेत.

Recent Comments