नरेंद्र चपळगावकर
महाराष्ट्र फाउंडेशन ग्रंथ पुरस्कार – २०००
न्या. नरेंद्र चपळगावकर हे केवळ कायदेतज्ज्ञच नाहीत तर ते रसिक वाङ्मयाभ्यासकही आहेत. कायद्याची पदवी आणि मराठी वाङ्मयाची स्नातकोत्तर पदवी त्यांनी प्रथम श्रेणीत मिळवली. वकिली सुरू करण्यापूर्वी त्यांनी एक वर्ष मराठीचे अधिव्याख्याते म्हणूनही कार्य केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी कविता केल्या, कथा लिहिल्या. ‘सत्यकथा’, ‘किर्लोस्कर’, ‘प्रतिष्ठान’ या मासिकांतून त्यांचे हे लेखन प्रसिद्धही झाले. १९६२ पासून त्यांनी वकिली सुरू केली. १९९० ते १९९९ या काळात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून काम केले.

Recent Comments